,

Musafir 1St Edition (Marathi) Paperback – 1 January 2012

275.00

Musafir 1St Edition (Marathi) Paperback – 1 January 2012

अच्युतच्या या पुस्तकाने मला चकित केलं आहे …. अच्युतचं सगळं व्यक्तित्व अफाट आहे…
….अफाट म्हणजे किती अफाट?… कुठं शहाद्याचे आदिवासी.. आणि कुठं ते अमेरिकेतले सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख मालक… कुठं सोलापूरच्या थेटरात जाऊन सिनेमे पाहणारा पोरगा, आणि कुठं … कम्प्युटर क्षेत्रात घुसणारा!…आणि अशी पुस्तकं लिहिणारा, की जगभर ती टेक्स्टबुकं म्हणून वापरली जातात! त्याचं ‘अच्युत’ हे नावही ‘अचाट’ला जवळचं आहेच…
…. ‘मुसाफिर’ अगदी म्हणजे अगदीच वेगळं लिहिलेलं…आतून आलेलं… शहाद्याच्या वेळेस तो दहा दिवस तुरुंगात गेला,….काय ग्राफिक, भयंकर चित्र उभं केलंय त्यानं…दहा दिवसांत सगळं तुरुंगविश्व उलगडणाऱ्या लेखकाची किती भेदक आणि व्यापक नजर…तीच गोष्ट वेश्यांच्या वस्तीबाबत…थक्क करणारं लिखाण…या सगळ्यामागे दिसणारी त्याची व्यापक आत्मीयता….
या लिखाणाला वा: म्हणायला धीर होत नाही. कारण तो वा: पलीकडचा आहे…..
….मुलाच्या आजारपणाबद्दल जे लिहिलंस, ज्या दु:खातून तुम्ही गेलात, जातही असाल. नुसते दु:ख करीत न बसता एक संस्था उभी केलीत. हे सगळं वाचून अवाक् झालो आहे! आता तू माझा फक्त मित्र राहिला नाहीस, तर ‘शिकवणारा’ मित्र झाला आहेस!
-अनिल अवचट
सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Musafir 1St Edition (Marathi) Paperback – 1 January 2012”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
× How can I help you?